पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाय्रा नेत्यानं पुन्हा एकदा आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे.
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांच्या पुरोगामी धोरणामुळे महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली आहे, समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी मोठे कामा उभे केले आहे, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे निर्णय घेतला असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुणे मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत पक्ष प्रवेश करून देखील काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलीचं नाही, मात्र पक्षाच्या नेत्यांनी आपुलकी देखील दाखवली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करत प्रवीण गायकवाड यांनी विधानसभेला राष्ट्रवादीसोत जाण्याचा निर्णय प्रवीण गायकवाड यांनी घेतला आहे.
COMMENTS