बीड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कट्टर विरोधक एकत्र आले असल्याचं दिसत आहे. अंबाजोगाईच्या स्थानिक राजकारणात काँग्रेसचे राजकिशोर मोदी आणि राष्ट्रवादीचे नंदकिशोर मुंदडा हे दोन्ही नेते राष्टेरवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. हे दोन्ही नेते एकत्रित आल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान अंबाजोगाई नगरपालिकेवर राजकिशोर मोदी यांचं गेली 25 वर्षांपासून वर्चश्व आहे. तर नंदकिशोर मुंदडा यांची केज विधानसभेत मोठी ताकद आहे. अंबाजोगाईतील राजकारणात हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. परंतु आगामी लोकसभेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी एकत्रित आले असल्याचं पहावयास मिळाले आहे.
COMMENTS