मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असून आज अजून दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
दरम्यान प्रकाश मेहता यांना शह देण्यासाठीच प्रवीण छेडा यांना भाजपात घेतलं असल्याचं बोललं जात असून
प्रकाश मेहता यांच्यासोबत झालेल्या वादानंतर 2012 मध्ये प्रवीण छेडा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2012 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार असणाऱ्या पराग शाह यांनी प्रवीण छेडा यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा प्रवीण छेडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
COMMENTS