काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक, बैठकीत ‘या’ विषयावर चर्चा !

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक, बैठकीत ‘या’ विषयावर चर्चा !

मुंबई  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानील ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. मतदारसंघाच्या वाटपाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, नसीम खान, शरद रणपिसे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते.

दरम्यान आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बैठकीत राज्यातील मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी 50-50 चा फॉर्म्यूला दिला आहे. त्यामुळे याबाबतही या दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे, औरंगाबादसह तीन-चार जागा बदलून हव्या आहेत तर काँग्रेसला दक्षिण अहमदनगर, दिंडोरी, यवतमाळ यासारख्या जागा हव्या आहेत. त्यामुळे याबाबतही या दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS