लोकसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ पाच उमदेवारांची नावं निश्चित, सुजय विखेंना उमेदवारी मिळणार ?

लोकसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ पाच उमदेवारांची नावं निश्चित, सुजय विखेंना उमेदवारी मिळणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत. काँग्रेसनं आज राज्यातील पाच उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये अमिता चव्हाण, धुळे येथे रोहिदास पाटील, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा; तसेच वायव्य मुंबईमधून संजय निरुपम यांची नावे निश्‍चित झाली आहेत. परंतु मुंबई काँग्रेसमधील मतभेद लक्षात घेता एक मार्च रोजी होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेवर परिणाम होऊ नये यासाठी मुंबईतील नावे गुप्त ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान नगरच्या वादग्रस्त जागेवर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे काँग्रेसनं विनंती केली आहे. त्यामुळे पवार ही जागा सोडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

तसेच उरलेल्या दहा जागांसाठी राज्य काँग्रेसने दोन ते तीन नावांची शिफारस केली आहे. छाननी समितीत या नावांची चर्चा करुन त्यानंतर या उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे 1 मार्चरोजी होणा-या राहुल गांधींच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS