काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आणखी एक घटक पक्ष सामील !

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आणखी एक घटक पक्ष सामील !

मुंबई – आगामी लोकसभी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आणखी एका पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होणार आहे. पालघरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती परंतु पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी एकत्र आले आहेत. त्यामुळे याठिकाणी आघाडीची ताकद वाढली आहे.

दरम्यान पालघरसाठी बहुजन विकास आघाडी आणि सीपीएमची आघाडी झाली असून या मतदारसंघात सी.पी.एमचे एक लाख मतदार आणि कार्यकर्ते आहेत. 2019 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाड़ी बरोबर ते राहणार आहेत. काल पत्रकार परिषदेत सी.पी.एम. चे नेते कॉमरेड डॉ. ढवळे, कॉमरेड मांगात, पॉलिट ब्यूरो सदस्य, सी.पी.एम. चे सर्व जिल्हा परिषद सदस्य, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकुर, कार्यकारी अध्यक्ष राजीवजी पाटिल, तथा अन्य गणमान्य बविआचे कार्यकर्ते, तथा बवीआचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या समवेत अधिकृत घोषणा करण्यात आली.

त्यानंतर आता बहुजन विकास आघाडीने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होणार आहे.

COMMENTS