काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक !

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक !

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती, विधान परिषदेची निवडणूक, सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत येत्या ६ फेब्रुवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही या बैठकीत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS