मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. याबाबत आज दोन्ही पक्षांती ज्येष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली आङे. 40 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित 8 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार होती. मात्र या आठ जागांचे वाटप आजच्या बैठकीत पूर्ण होऊ शकलेले नाही. आठ पैकी 4 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत तर उर्वरित 4 जागांची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये अदलाबदलीवरून अडली आहे.
पुणे, औरंगाबाद, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण अहमदनगर या चार जागांवर अदलाबदलीची चर्चा सुरु आहे. दक्षिण अहमदनगरमधून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील इच्छूक आहेत, तर पुण्याची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे. औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण इच्छूक आहेत आणि उत्तर मध्य मुंबईची जागाही राष्ट्रवादीने मागितली आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS