मुंबई – साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. शिवेंद्रराजे यांच्यानंतर आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. अहमदनगरमधील अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड तर काँग्रेसचे मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. या तीन आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान हे तीनही नेते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातील जावळी मतदारसंघातील आमदार आहेत. वैभव पिचड अहमदनगर येथील अकोले मतदारसंघातील आमदार आहेत. तर कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा मतदारसंघातील आमदार आहेत. या तिघांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS