महाविकास आघाडीत नाराजीचा सूर, शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तक्रार !

महाविकास आघाडीत नाराजीचा सूर, शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तक्रार !

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार या मंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे. याबाबत शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. काही शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करताना प्रशासनाने मंत्र्यांना विश्वासात घेतलं नसल्याच्याही मंत्र्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नाराजी दुर करण्यासाठी शरद पवार उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.

COMMENTS