प्रकाश आंबेडकरांना शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा नवा प्लॅन !

प्रकाश आंबेडकरांना शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा नवा प्लॅन !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने  हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे. आघाडीने आता समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आघाडीच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सभेत दलित-मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 22 जागा मागितल्याने ही महाआघाडी होण्याची शक्यता मावळली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतून हालचाली सुरू केल्याचं म्हटलं जातं. राज्यात सपाला लोकसभा जागा देण्याऐवजी विधानसभा जागा जास्त देण्याचा विचार केला जात आहे. तर विदर्भात बसपाचीही ताकद काही भागात चांगली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला याठिकाणी फायदा होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सपा, बसपातील नेत्यांच्या हालचालींकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS