राजू शेट्टींचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का ?

राजू शेट्टींचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का ?

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत बिघाडी होणार असल्याचं बोललं जात आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन चौथी आघाडी बांधण्याच्या तयारी करत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जर चौथ्या आघाडीची स्थापना केली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांचा मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

 

दरम्यान स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. परंतु स्वाभिमानीने मागितलेल्या सर्वच जागा काँग्रेस-राष्ट्रवादी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे जागावाटपाचं गणित जुळत नाही. त्यामुळे राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवाय आघाडी उभारण्याच्या तयारीत असून ते इतर पक्षातील तिकिट न मिळालेल्या बंडखोर नेत्यांना सोबत घेऊन चौथी आघाडी स्थापन करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती, दीडपट हमीभावाचे विधेयक यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळेही राजू शेट्टी नाराज असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS