उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर!

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर!

मुंबई – राज्यात लवकरच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार? असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु
अडिच वर्षांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद मागितले असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

तसेच काँग्रेस राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. तसंच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं तर राष्ट्रवादीतून अजित पवार यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसेच दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार की हे पद पुन्हा शिवसेनेकडे राहणार, याबाबत अजून स्पष्टता नाही परंतु लवकरच तेही स्पष्ट होऊ शकते.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

अजित पवार

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

जयंत पाटील

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

अनिल देशमुख

दिलीप वळसे पाटील

राजेश टोपे

मकरंद पाटील

काँग्रेस संभाव्य नेत्यांची यादी

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवार

यशोमती ठाकूर

सतेज बंटी पाटील

सुनिल केदार

के सी पाडवी

विश्वजीत कदम

COMMENTS