नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी लवकरच सुटणार असल्याचं दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित येवून सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. याबाबत तिन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्या मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होणार असून त्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
तसेच यानंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेनेसोबत बैठक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्व नेते सोमवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर 27 नोव्हेंबर पर्यंत शपथविधी होईल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सर्वच मुद्यांवर एकमत झालं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता सगळं लक्ष शिवसेनेवर केंद्रीत होणार आहे. पुढची रणनीती काय असावी यावरही शिवसेनेसोबत चर्चा होणार असून सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS