महाशिवआघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यातील महत्त्वाचे मुद्दे, काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाची मागणी?

महाशिवआघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यातील महत्त्वाचे मुद्दे, काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाची मागणी?

मुंबई  – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला असून यावर राज्यातील नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. हा ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे. महाशिवआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देखील ते देतील अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्राफ्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे…

1) शेतकय्रांना नुकसानभरपाई लवकरात लवकर देणे.

2) शेतकय्रांना सरसकट कर्जमाफी

3) शेतकय्रांना विजबीलात सवलत देणे.

4) पिकविमा योजनेद्वारे तात्काळ मदत देणे.

5) राज्यातील रोजगार वाढवणे.

6) मराठी माणसांना नोकरीत सवलत देणे.

7) शिक्षण आणि आरोग्यविषयक सोयीसुवीधांवर भर देणे.

8) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची निर्मिती करणे.

9) बाबासाहेब अंबेडकर यांच्या स्मारकाची निर्मिती आणि विकास करणे.

तिनही पक्षांमधील हे मतभेद ठेवणार बाजूला

1) उग्र हिंदुत्त्वासारखे भावनिक मुद्यांपासून दुर राहणे.

2) उत्तर भारतीय आणि परप्रांतियांवरील घोषणाबाजीपासून दूर राहणे.

3) वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मुद्यावर असहमती.

4) बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक निर्मिती.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाबाबतचा फार्म्युला

अडिच वर्ष शिवसेनेचा तर अडिच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री तसेच पाच वर्ष काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु शिवसेना मात्र पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. तर काँग्रेसकडून एक वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्रीपद नसेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाबाबतही चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

16- 14- 12 मंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याची शक्यता

राष्ट्रवादी – गृह मंत्रालय

शिवसेना – वित्त आणि नगरविकास

काँग्रेस – विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादी – विधानसभा उपाध्यक्ष

COMMENTS