आघाडीनं समाजवादी पार्टीला ‘या’ तीन जागा सोडल्या, अबू आझमींची नाराजी दूर!

आघाडीनं समाजवादी पार्टीला ‘या’ तीन जागा सोडल्या, अबू आझमींची नाराजी दूर!

मुंबई – समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांची आघाडीवरील नाराजी अखेर दूर झाली आहे. माझ्याकडे ५७ उमेदवार आहेत. लोकसभेला आघाडीने माझा सन्मान ठेवला नव्हता. त्यामुळे मी यावेळी देखील आघाडीसाठी उत्सूक नव्हतो. मात्र मी मागितलेल्या तीन जागा काँग्रेसने मला दिल्यामुळे आता आघाडीत आलो असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाला आघाडीनं तीन जागा दिल्या आहेत. औरंगाबाद पूर्व,
शिवाजी नगर (मानखुर्द), भिवंडी ईस्ट या जागा आघाडीने दिल्या आहेत त्यामुळे त्यांची नाराजी
दूर झाली आहे.

दरम्यान अबू आझमी हे आघाडीवर गेले काही दिवस नाराज होते. ते एआयएमसोबत जाणार असल्याची चर्चा होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये 38 जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र या जागावाटपात समाधानी नसल्याने समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं आमदार अबु आझमी यांनी म्हटलं होतं. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात आघाडीला यश आलं आहे.

COMMENTS