‘या’ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा मनसेला पाठिंबा!

‘या’ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा मनसेला पाठिंबा!

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं थेट मनसेला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीनं मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला धक्का देण्यासाठी सर्व विरोधक एकवटले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या मतदरासंघात भाजपकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पाटील यांच्याविरोधात मनसेकडून किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे या मतदारसंघात अद्यापही सक्षम उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना पाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं मनसेला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. मनसे उमेदवाराला विरोधी पक्षांतर्फे पाठिंबा देण्यात येणार असल्यामुळे कोथरूडमध्ये थेट लढत होणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी निवडून येण्यासाठी सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली आहे. त्यांच्या या उमेदवारीला पक्षातील स्थानिकांनीही विरोध केला परंतु तडजोड करुन पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परंतु आता पाटील यांना धक्का देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे या विरोधकांचा सामना पाटील कसे करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS