नवी दिल्ली – काँग्रेसची आज नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल करण्यात आले असून जुन्या आणि दिग्गज नेत्यांनाही यातून वगळण्यात आलं आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे, मोहनप्रकाश, सी. पी. जोशी, आणि जनार्दन द्विवेदी या नेत्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आलं आहे. या कार्यकारिणीत २३ सदस्य, १९ स्थायी आमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या कार्यकारिणीतील सदस्य
राहुल गांधी – राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष
वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा
अशोक गहलोत
गुलाम नबी आझाद
मल्लिकार्जुन खर्गे
ए. के. अँटोनी
अहमद पटेल
अंबिका सोनी
ओमान चांडी
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत वरिष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा
मुकूल वासनिक
अविनाश पांडे
के. सी. वेणुगोपाल
दीपक बाबरिया
ताम्रध्वज साहू
रघुवीर मीणा
आणि गैखनगम यांचा समावेश आहे.
स्थायी आमंत्रित सदस्य
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, पीएल पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंटिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्तीसिंह गोहिल, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पी. सी. चाको, जितेंद्र सिंह, गौरव गोगोई आणि ए. चेल्लाकुमार यांचा समावेश आहे.
विशेष आमंत्रित सदस्य
के. एच. मुनियप्पा, अरुण यादव, दिपेंद्र हुड्डा, जीतिन प्रसाद, कुलदीप विश्नोई, एनएसयुआयचे अध्यक्ष फिरोज खान, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव, इंटकचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी, भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, आणि काँग्रेस सेवा दलाचे मुख्य संगठक लालजीभाई देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व नवी सदस्यांची बैठक २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS