मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘गांधीभवन’ हे कार्यालय आजपासून नविन वास्तूमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे.
कार्यालयाचा नवीन पत्ता
गांधी भवन, तन्ना हाऊस, पहिला मजला,
नाथालाल पारेख मार्ग, मॅजेस्टीक आमदार निवासजवळ
कुलाबा, मुंबई.
दरम्यान यावेळी विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, रणजीत कांबळे, बस्वराज पाटील, भाई जगताप, हुस्नबानो खलिफे, हरिभाऊ राठोड, रामहरी रूपनवर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सचिव शाह आलम, राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS