राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान, देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोश !

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान, देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोश !

दिल्ली – राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतली आहे. सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र सुपुर्द करण्यात आलं आहे. या शाही सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. दिल्लीतील २४ अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र राहुल गांधींच्या हाती सोपविल्यानंतर सोनिया गांधी यांनी राहुल गांधींचे अभिनंदन केले आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून मी हे शेवटचं भाषण करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. १९ वर्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच राहुल गांधी हे गांधी  घराण्यातील  काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे सहावे व्यक्ती आहेत.  त्यामुळे आजपासून काँग्रेसमध्ये राहुल पर्वाला सुरुवात झाली आहे.

 

COMMENTS