मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम यांना धक्का बसला असून मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक नेते आणि आमदारांची नाराजी निरुपम यांना भोवली असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर उत्तर मुंबईतून निवडणूक न लढवण्याची निरुपम यांची भूमिकाही पक्षाला खटकली होती. त्यामुळे त्यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या ठिकाणी मिलिंद देवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान निरुपम यांना बदलण्यासाठी अनेकदा मुंबईतील नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. एकनाथ गायकवाड, भाई जगताप, कृपाशंकर सिंह, अमिन पटेल, नसीम खान हा निरुपम विरोधी गट मानला जात आहे.राहुल गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षात गोंधळ माजण्याची शक्यता आहे. निरुपम समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.
तसेच एकीकडे अध्यक्षपद गमवावे लागलेल्या संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी लोकसभेची उमदेवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या यादीत निरुपम यांचे नाव असून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निरुपम यांची नाराजी दूर होईल असंही बोललं जात आहे.
COMMENTS