मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली उत्तरे उडवाउडवीची असल्याने हिम्मत असेल तर सरकारने खुल्या चर्चेला यावे, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.
या संदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील भ्रष्टाचार आम्ही पुराव्यासह उघड केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी देखील भ्रष्टाचाराला अधोरेखीत करून चौकशीची मागणी केली होती. असे असतानाही सरकारकडून या प्रकरणाच्या चौकशीची टाळाटाळ केली जात आहे. जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत याकरिता हिंमत असेल तर सरकारने खुल्या चर्चेला यावे.
चंद्रकांत पाटील किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांने लवकरात लवकर आपल्या पसंतीच्या व्यासपीठावर चर्चेला यावे असे खुले आव्हान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना दिले आहे. या प्रकरणात “दूध का दूध पानी का पानी” होऊनच जाऊ द्या असे सावंत म्हणाले.
COMMENTS