नवी दिल्ली – भाजपचे खासदार मनोज तिवारी यांना काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज तिवारी यांचे संस्कार दिसत असल्याचा पलटवार काँग्रेसनं केला आहे. एका छत्तीसगडमधील निवडणुक प्रचारसभेदरम्यान बोलत असताना मनोज तिवारी यांनी सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मुलगा जन्माला आला असतं असं वक्तव्य केलं होतं. मनोज तिवारी यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रसने या वक्तव्याचा निषेध केला असून या वक्तव्यावरुन मनोज तिवारी यांचे संस्कार दिसून येत असल्याचा पलटवार केला आहे.
दरम्यान ज्या महिला छट पूजा करतात त्यांच्या पोटी हुशार मुले जन्माला येतात. मात्र सोनिया गांधींने कधी छट पूजा केलीच नाही. त्यामुळेच सगळा गोंधळ झाला असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे. ‘सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मुलगा जन्माला आला असता.
तसेच छट पूजा करणाऱ्या महिलांच्या पोटी हुशार मुले जन्माला येतात. तसेच ही मुले देशभक्त तर असतातच शिवाय अशी मुले भ्रष्टाचारही करत नाहीत असंही यावेळी तिवारी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली असून तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे तिवारी यांचे संस्कार दिसून येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
COMMENTS