शिवसेनेचा खासदार हरवला आहे, काँग्रेसची मुंबईतील अनेक भागात बॅनरबाजी !

शिवसेनेचा खासदार हरवला आहे, काँग्रेसची मुंबईतील अनेक भागात बॅनरबाजी !

मुंबई – खासदार हरवला आहे, आपण यांना पाहिलत का ? अशी बॅनरबाजी मुंबईतील अनेक भागात पहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी ही पोस्टरबाजी केली आहे. आपण यांना पाहिलंत का? खासदार हरवला आहे, जिथे असाल तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं होतं. काँग्रेसच्या या बॅनरबाजीमुळे मोठी खळबळ उडाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान ही बॅनरबाजी पाहताच स्थानिक शिवसैनिकांना रस्त्यावर उतरुन काँग्रेसनं लावलेली पोस्टर्स काढून टाकली आहेत. मी एक सामान्य मतदार म्हणून खासदार सावंत यांना अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे अरविंद सावंत हे नेहमीच सर्वांच्या संपर्कात असतात, असा शिवसेनेचा दावा आहे. तसंच हिंमत असेल तर असे बॅनर दिवसा लावून दाखवा, असं आव्हानही शिवसेनेनं केलं आहे. त्यामुळे या बॅनरबाजीवरुन आता शिवसेना, काँग्रेसमध्ये जुपली असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS