मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात काँग्रेसमधील काही नेत्यांना संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची चर्चा होती. परंंतु अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान मंत्रिमडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. उद्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, 12 डिसेंबरला खातेवाटप झालं होतं. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
COMMENTS