काँग्रेसमधील आणखी दोन नेते पक्षात असून नसल्यासारखे, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे खळबळ !

काँग्रेसमधील आणखी दोन नेते पक्षात असून नसल्यासारखे, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे खळबळ !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्यानंतर कुणीच विरोधी पक्षनेते पदावर काम करण्यासाठी इच्छूक नाही. मुळात दोन तीन महिने राहिल्यामुळे या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी कुणी तयार नसून विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचा होणारच नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच विखे-पाटील पक्ष सोडून गेले. आणखी दोघेजण पक्षात असून पक्षासोबत नसल्यासारखे आहेत असं खळबळजनक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे हे दोन नेते कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखेंनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर काँग्रेसमध्ये या पदासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या पदात मला रस नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे घ्यायला फारसे उत्सुक नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS