पुणे आणि रावेर लोकसभेसाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

पुणे आणि रावेर लोकसभेसाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

मुंबई – पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबतचा तिढा गेली अनेक दिवसांपासून सुरु होता. परंतु हा तिढा अखेर सुटला असून  पुण्यातून काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काल ९ वी उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातून पुण्यातून मोहन जोशी तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड हे नेते इच्छुक होते. प्रवीण गायकवाड यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.परंतु गेल्या ३८ वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असणाय्रा जोशी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला आहे.

COMMENTS