काँग्रेसला एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसल्याने पक्ष संघटना अस्वस्थ !

काँग्रेसला एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसल्याने पक्ष संघटना अस्वस्थ !

मुंबई – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी त्यांच्या पदाचे काल राजीनामे दिले. त्यानंतर आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेरला जाहीर सभा होत आहे. त्यांच्या आज होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सभेसाठी पुढाकार घेतला आहे. या सभेत काँग्रेसचे नेते नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसल्याने पक्ष संघटना अस्वस्थ झालेली आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार खासदार लोखंडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

पुत्रप्रेमापोटी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी एका महिन्याच्या आतच पदाचा राजीनामा दिला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष होण्याच्या वयात त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला होता. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या वक्तव्यावर नाराज होऊन करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एकाच दिवशी शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसले.
या धक्क्या नंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर येथे जाहीर सभा होत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS