राहुल गांधींचा धाडसी निर्णय, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीय कार्यकर्त्याची नियुक्ती !

राहुल गांधींचा धाडसी निर्णय, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीय कार्यकर्त्याची नियुक्ती !

नवी दिल्ली –  राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीय कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्यांनी तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं आहे. अप्सरा रेड्डी यांची नियुक्ती केल्यामुळे राहुल गांधी यांनी धाडसी निर्णय   घेचला असल्याचं बोललं जात आहे.नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महिला काँग्रेसच्या प्रमुख सुश्मीता देव यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान अप्सरा रेड्डी या तामिळनाडूच्या असून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार म्हणून त्यांनी लहान मुलांवरच्या अत्याचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत. या नियुक्तीमुळे आता महिलांसाठी काम करण्याचं मोठं व्यासपीठ मिळाल्याची भावना अप्सरा रेड्डी यांनी व्यक्त केली आहे. महिला, तृतीयपंथी, लहान मुलं यांच्या सामाजिक प्रश्नांवर अधिक जोमानं काम करणार असल्याचंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS