काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांना सचिवपदावरुन हटवलं !

काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांना सचिवपदावरुन हटवलं !

मुंबई – काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांना पक्षानं मोठा झटका दिला असून त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीच्या सचिवपदावरुन हटवलं आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गहलोत यांनी याबाबत पक्षाच्या निर्यणाचे अधिकृत पत्र दत्त यांना यापूर्वीच दिले होते. त्यानंतर त्यांना सचिवपदावरुन काढण्यात आलं असल्याची घोषणा केली आहे. तसेच गहलोत यांनी दत्त यांच्या कामगिरीचे कौतुकही केलं आहे. तसेच भविष्यात त्यांची पक्षाला गरज असल्याचेही गहलोत यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु दत्त यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

 

COMMENTS