कोल्हापूर – कोल्हापुरातील काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा, मला काही फरक पडत नसल्याचं सतेजा पाटटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे भानामती आमच्या घराकडे येऊ लागली आहे. तुम्ही भानामती करा, लिंबू बांधा, किंवा दुसरं काही पण करा, मला काही फरक पडत नाही आणि मी त्याला घाबरत पण नाही.आमचं ठरलं आहे, कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सतेज पाटील यांच्या कोल्हापुरातील कसबा बावडा भागातील यशवंत निवासस्थानासमोर बुधवारी भानामतीचा प्रकार उघडकीस आला. झुडपात पांढऱ्या कपड्यात काळी बाहुली बांधून त्याला हळदी कुंकू लावण्यात आलं होतं. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत, तोच मंगळवारी अमावस्येच्या मध्यरात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आली. त्यावर सतेज पाटील यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा, मला काही फरक पडत नसल्याचं सतेजा पाटटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS