…तर भाजपला सत्तेपासून मुकावं लागेल !

…तर भाजपला सत्तेपासून मुकावं लागेल !

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीदरम्यान भाजप सुरूवातीला ११३ जागांनी आघाडीवर होती. परंतु हा आकडा आता घसरत असल्याचं दिसून येत असून अचानक बहुमताचा आकडा ११२ च्या खाली गेला आहे. त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी ६ ते 7 आमदारांची कमतरता भासणार आहे. त या निवडणुकीदरम्यान ३ अपक्ष निवडून आले आहेत, तर जेडीएस आणि काँग्रेस यांचा आकडा मिळून बहुमताचा आकडा पार होवू शकतो, यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेपासून मुकावं लागणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या असून सोनिया गांधी यांनी जेडीएसचे एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरून चर्चा सुरू केली असल्याची माहिती आहे. याठिकाणी काँग्रेस ७३ ठिकाणी आघाडीवर आहे, तर जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवर असलेल्या एकूण जागांची आकडेवारी ही ११४ होत आहे. काँग्रेस जेडीएसला सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ शकते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकाचा कल शेवटच्या टप्प्यात बदलल्याने राजकीय समीकरणं देखील बदलत बदलत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश येणार की भाजपकडून वेगळी खेळी खेळली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS