मला ‘जी’ भीती वाटत होती ‘ती’ खरी ठरली – सोनिया गांधी

मला ‘जी’ भीती वाटत होती ‘ती’ खरी ठरली – सोनिया गांधी

मुंबई – काँग्रसेच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या कालपासून मुंबईच्या दौ-यावर आहेत. आज त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल मला जी भीती वाटायची ती खरी ठरली असल्याचं म्हटलं आहे. राजीव गांधी यांनी राजकारणात उतरू नये असं त्यांना वाटायचं. याबद्दल त्यांना विचारलं असता राजीव गांधी राजकारणात उतरले तर त्यांची हत्या होईल अशी मला सतत भीती वाटत होती आणि या भीतीमुळेच माझा या गोष्टीला विरोध होता त्यामुळे माझी भीती खरी ठरली असल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. ‘शायनिंग इंडिया’ या नाऱ्याचे जे झाले तेच ‘अच्छे दिन’चंही होणार असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपकडे उत्तम आश्वासने आहेत मात्र त्यातली किती पूर्ण झाली असा सवाल सोनिया गांधी यांनी विचारला आहे. या देशाचा जो काही विकास झाला आहे तो फक्त ४ वर्षांतच झाला आहे का असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आणि सध्याचे सरकारची तुलना करत असताना सोनिया गांधी म्हणाल्या की वाजपेयी हे विरोधकांचाही आदर करायचे. आम्ही कडवे विरोधक होतो, मात्र संसदेचं काम उत्तम पद्धतीने चालायचं. परंतु आता संसदेत विरोधांचा आवाज दाबला जात असल्याचंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS