सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचा शिवसेनेला ‘या’ अटीवर पाठिंबा ?

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचा शिवसेनेला ‘या’ अटीवर पाठिंबा ?

नवी दिल्ली –  राज्यात शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस सशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीत शिवसेनेपुढे एक अट ठेवली असल्याची माहिती आहे. शिवसेना एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली, तरच काँग्रेस पाठिंबा देईल, अशी अट सोनिया गांधी यांनी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधींसोबत पवारांनी चर्चा केली होती. या चर्चेत सोनिया गांधी यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीत शिवसेनेपुढे एक अट ठेवली असल्याची माहिती
आहे. शिवसेना एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली, तरच काँग्रेस पाठिंबा देईल, अशी अट सोनिया गांधी यांनी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS