मुंबई – काँग्रेसच्या अध्यपदाचा राजीनामा राहुल गांधी यांनी अखेर दिला आहे. राहुल गांधी यांनी मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपद हे खूपच जबाबदारीचं पद असल्याचं म्हटलं आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो आहे. त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी नेत्याची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. सध्या दलित व्होटबँक काँग्रेसपासून दुरावली आहे. यूपीमध्ये मायावती, महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नवे वाटेकरी निर्माण झाल्याने काँग्रेस या महत्त्वाच्या राज्यात आपला बेस गमावून बसली आहे. त्यामुळे दलित अध्यक्ष देऊन काँग्रेस एका मोठ्या वर्गाला सोबत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS