सांगली – बनावट मतदान ओळखपत्राप्रकरणी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सांगली सहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. राहुल आर्ट या फर्मविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान नोंदणी अदिकारी प्रदीप शेलार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
महादेव पाटील, काँग्रेस, तालुकाध्यक्ष
दरम्यान राहुल आर्ट या फर्मने राहुल जाधव या नावे बनावट मतदान ओळखपत्र बनविण्याचे उघडकीस आले होते. राहुल आर्टवर गुन्हा दाखल केल्यानंतर या फर्मची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत महादेव पाटील यांचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे महादेव पाटील यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS