नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर देशविदेशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. परंतु काँग्रेसने वाहिलेल्या या श्रद्धांजलीवर युजर्स भलतेच संतापले असल्याचं पहावयास मिळालं आहे. काँग्रेसच्या या ट्वीटवर प्रचंड टीका पाहून काँग्रेसला आपल्या ट्विटर हॅंडलवरून हे ट्विट काढून टाकावे लागले आहे.
https://twitter.com/VikasSaraswat/status/967585636063395842
दरम्यान ‘श्रीदेवींचे निधन झाल्याची बातमी कळल्यावर आम्हाला प्रचंड दु:ख झाले. त्या एक गुणी अभिनेत्री होत्या. आपला अभिनय आणि उत्कृष्ट काम यामुळे त्या आमच्या हृदयात सदैव राहतील. त्यांचे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. श्रीदेवी यांना यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते’. काँग्रेसनं अशाप्रकारचं ट्वीट केलं असून या ट्वीटवर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/SirJadeja/status/967587549567791104
कारण ‘श्रीदेवी यांना यूपीए सरकारच्या काळात २०१३मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते’, या वाक्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे. किमान श्रद्धांजलीच्या वेळी तरी काँग्रेसने अशाप्रकारचं राजकारणमध्ये आणू नये अशी संतापजनक प्रतिक्रिया या यूजर्सनी दिली आहे.
Seriously? Was the UPA bit for giving her a Padma Shri really necessary in a condolence message. What kind of idiots are you guys
— Masakadzas (@Nesenag) February 25, 2018
COMMENTS