काँग्रेसला जोरदार धक्का, दोन आमदार भाजपच्या गळाला !

काँग्रेसला जोरदार धक्का, दोन आमदार भाजपच्या गळाला !

गोवा – काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर या दोन काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला आहे. तसेच या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांनीही राजीनामा दिला असून ते दोघेही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु

दरम्यान पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसने गोव्यात भाजपाला हादरा देण्याची तयारी सुरु केली होती. भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र, दुसरीकडे भाजपानेच काँग्रेसला मोठा हादरा दिला असून दोन आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गोव्यात याचा मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS