मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे. असे उद्धव ठाकरे यांनी धारावीतील भाषणादरम्यान म्हटलं होतं. उद्धव ठाकरे या वक्तव्याचा समाचार काँग्रेसनं घेतला असून मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रवाला आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. पण मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान ‘डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखावी यासाठी शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी ठाकरे यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
COMMENTS