मुंबई – विधानपरिषदेच्या आमदारांमधून निवडून दिल्या जाणा-या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यास त्यांचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. गेल्यावेळी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर यांच्यासाठी दोन जागा घेतल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेस दोन जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्रानी यांच्या नावाची घोषणाही झाली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता लागली आहे,
काँग्रेसकडून 2 जागांसाठी तब्बल 30 जण इच्छुक असल्याचं कळतंय. प्रत्येकजण तिकीटासाठी आपआपल्या परीने जोरदार लॉबिंग करत आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस यावेळी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना उमेदवारी देणार नाही. तसंच यावेळी तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल अशीही चर्चा आहे. त्यामुळे एक जागा ही मुंबईतील अशाच कार्यकर्त्याला मिळण्याची शक्यता आहे. दुसरी जागा आता कोणाच्या पदरात पडते याची उत्सुकता आहे.
COMMENTS