सांगली – पलूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व अपक्ष मेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले असून काही वेळा पूर्वीच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजप आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. परंतु चंद्रकांत पाटील यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यामुळे विश्वजित कदम यांचा या निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान यासंदर्भात कडेपूर येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे राजाराम गरूड हे उपस्थित होते.
COMMENTS