काँग्रेसनं दिली देशव्यापी आंदोलनाची हाक !

काँग्रेसनं दिली देशव्यापी आंदोलनाची हाक !

नवी दिल्ली – देशभरात सध्या वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात काँग्रेसनं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १० सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिली आहे. इंधन किंमतीवरुन केंद्र सरकारने लूट चालवली असून रोजच्या रोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. याचा निषेध म्हणून काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे.

दरम्यान राजधानी दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ७९.५१ पैसे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७१.५५ पैसे आहे. या किंमतीने मागचे सर्व रेकॉर्ड मोडले असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्य़ा तुलनेत रुपयाच्या घसरणीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला असला तरी सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यावर तोडगा काढून लवकरात लवकर इंधनाचे दर कमी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

 

COMMENTS