मुंबई – शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाजपा – शिवसेनेचं जुळत नसेल तर पर्याय देण्याबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते सकारात्मक असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज सायंकाळी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे लक्षलागलं आहे.
दरम्यान शरद पवार यांची भेट घेऊनही काँग्रेस नेत्यांनी याबाबतच चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहो. यावेळी पवार यांनी काँग्रेसने आधी आपली भूमिका ठरवावी, असं म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास एकत्रित संख्याबळ 167 वर पोहचणार आहे.
COMMENTS