विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार ?, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया !

विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार ?, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया !

मुंबई –  राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कोणावर सोपली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.  याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाईल हे आत्ताच सांगता येत नाही. विखे गेल्यावर काँग्रेसच्या आमदारांची संख्या किती राहिल, त्यावरून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून पक्षापासून दुरावलेल्या
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आज संगमनेरच्या दौय्रादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे करण ससाणे यांची भेट घेतली. त्यामुळे नगरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत
मिळाले असल्याची चर्चा सुरु आहे.

COMMENTS