नवी दिल्ली – युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. परंतु राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? अशी चर्चा आता रंगली आहे.
दरम्यान या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, कारण राहुल गांधी यांना पर्याय नसल्याचे मत खासदारांनी मांडले. खासदारांचे म्हणणे राहुल गांधी यांनी ऐकून घेतले, परंतु पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा हाच आपला निर्णय अंतिम असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशोक गहलोत हे पुढील काँग्रेस अध्यक्ष होतील, अशी चर्चा आहे. परंतु पक्षात कुठलीही हालचाल नसल्याचे दिसत आहे.
COMMENTS