मुंबई – राज्यातील बांधकाम मजूरांना ठाकरे सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे सरकारने या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वतः कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत माहिती दिली इसून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठक झाली. यात बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणींमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याबाबत चर्चा झाली.
लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांचा दररोजचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी कामगारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने कामगार मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रीय बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS