सहकारमंत्री सुभाष देशमुखांची गाडी बळीराजा शेतकरी संघटनेने अडवली

सहकारमंत्री सुभाष देशमुखांची गाडी बळीराजा शेतकरी संघटनेने अडवली

ऊस दर जाहीर करावा  या मागणीसाठी  बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडविण्यात आली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रवेश द्वारावर ही गाडी आवडविण्यात आली. बळीराजा शेतकरी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गाडी आवडून धरली.

यावेळी  बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्यात झटापटही  झाली. मात्र लगेचच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील – घाटनेकर यांनी नुकताच मागील हंगामातील उसाला आणखी300रुपये द्यावेत तसेच यंदाच्या गाळप हंगामातील उसाला पहिली उचल 3000 रुपये द्यावी त्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू देणार नाही असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख गाळप हंगाम शुभारंभासाठी आले होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडविण्यात आली.

 

 

COMMENTS