मुंबई – आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढत. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
करोना विरोधातील या युद्धात आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. कारण आपण जर एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा लॉकडाउन कडक पद्धतीने करावा लागेल. ही सूचना मी नाही तर करोना आपल्याला देतो आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(रविवार) नागरिकांना सूचक इशारा दिला. “माझे कुटुंबं माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली, तेव्हा आपण सर्वजण घरामध्ये होता. घरा-घरांमध्ये आपले आरोग्य व अन्य सर्व यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर अवघड आहे. याचं कारण तेव्हा तुम्ही घरांमध्ये होता आता सगळे घराबाहेर आहात. मग या यंत्रणेवर किती ताण टाकायचा. मी म्हटलं की आता लॉकडाउन करावा लागेल का? तर काही जण म्हणतात तुम्ही तपासण्या वाढवा. तपासण्या देखील वाढवल्या आहेत. पण एका यंत्रणेवर आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं हा त्या यंत्रणेशी केलेला अमानुषपणा आहे, असं मी म्हणेल.”
COMMENTS