पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, 21 मंत्री, कर्मचाय्रांना कोरोनाची लागण!

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, 21 मंत्री, कर्मचाय्रांना कोरोनाची लागण!

मुंबई – आजपासून 2 दिवस होत असलेल्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट पहायला मिळत आहे. अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून प्रत्येक जणांची स्वॅब टेस्ट घेतली गेली. यामध्ये तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे. यामध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. उर्वरित कारी मंत्री, मंत्रालय अधिकारी, कर्मचारी, विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील कोरोना झाला असल्याची माहिती आहे.

दरम्यान ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशा लोकांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचं बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून कळवलं आहे. काही आमदारांची वयाचं कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितल आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला 25 टक्के आमदारांची उपस्थिती घटणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS