कोलकाता – देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आणखी एका आमदाराचं निधन झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार तमनश घोष यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या महिन्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकत्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज अखेर कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे.
He has left a void that will be difficult to fill. On behalf of all of us, heartfelt condolences to his wife Jharna, his two daughters, friends and well wishers. (2/2)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 24, 2020
दरम्यान तमनश घोष हे दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फालता विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. घोष यांच्या निधनाने पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त केला आहे. तमनश घोष यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे कठीण जाईल.अत्यंत दु:खद. तमनश घोष हे फालता मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. 1998 पासून ते पक्षाचे कोषाध्यक्ष राहिले होते. त्यांचा निरोप घेताना निरतिशय दु:ख होत आहे. तमोनश घोष 35 वर्षांहून अधिक काळ आमच्यासोबत होते. जनता आणि पक्षासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी सामाजिक कार्य करुन मोठे योगदान दिले.” अशी भावना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
COMMENTS